शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

राज्यातील तीव्र कुपोषित बालकासाठी विशेष पूरक आहार देण्याची राज्याची योजना - १९ ऑगस्ट २०१७

राज्यातील तीव्र कुपोषित बालकासाठी विशेष पूरक आहार देण्याची राज्याची योजना - १९ ऑगस्ट २०१७

* युनिसेफकडून जगभरातील तीव्र कुपोषित बालकासाठी विशेष पूरक आहार दिला जातो. तर गुजरातमध्येही युनिसेफच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येते.

* नंदुरबार येथील धडगाव व अक्कलकुवा येथे प्रायोगिक तत्वावर [ टाटा ट्रस्टच्या माध्यमातून हा विशेष पूरक आहार प्रकल्प राबविण्यात आला होता.

* महाराष्ट्राच्या ग्रामीण त्यातही सोळा आदिवासी जिल्ह्यामध्ये तीव्र व अतितीव्र कमी वजनाच्या बालकांचा प्रश्न गेली अनेक वर्षे सतावत होता.

* टाटा ट्रस्टने राबविलेल्या विशेष पूरक आहार दिल्यानंतर बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचे [ टाटा ट्रस्ट ] व युनिसेफच्या अहवालात म्हटले आहे.

* राज्यात ही योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडडणवीस यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. हा उपक्रम राज्यात राबविण्यासाठी निविदा काढल्या आहेत.

* त्यासाठी जवळपास दोनशे टन विशेष पोषक आहार तीव्र कमी वजनाच्या बालकासाठी घेतला जाणार आहे. यासाठी सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या धर्तीवर [ एनर्जी डेन्स न्यूट्रीशियन फूड ] हा विशेष आहार व त्यांच्या पाककृतीसाठी डॉ अलका जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती निश्चित करण्यात आली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.