मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

खेलरत्न, अर्जुन पुरस्काराची अंतिम यादी जाहीर - २३ ऑगस्ट २०१७

खेलरत्न, अर्जुन पुरस्काराची अंतिम यादी जाहीर - २३ ऑगस्ट २०१७

* निवड समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अर्जुन, द्रोणाचार्य, खेलरत्न, ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराची यादी जाहीर केली आहे.

* या समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी पॅरालिंपियन देवेंद्र झांझरिया आणि माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग यांच्या खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले.

* या यादीत ७ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य, १७ क्रीडापटूंना अर्जुन, तिघांना ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार सोहळा क्रीडादिनी २९ ऑगस्ट राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे.

* खेलरत्न पुरस्कारासाठी पदक, मानपत्र आणि रोख ७.५ लाख, अर्जुन द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारासाठी ब्राँझचा पुतळा, प्रमाणपत्र आणि रोख ५ लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

[ पुरस्कार्थींची अंतिम यादी ]

* खेलरत्न पुरस्कार - देवेंद्र झांझरिया - पॅरा ऍथलिट, सरदार सिंग - हॉकी.

* द्रोणाचार्य पुरस्कार - स्व. डॉ आर गांधी [ ऍथलेटिक्स ], हिरा नंद कटारिया [ कबड्डी ], जी. एस. एस. व्ही प्रसाद [ बॅडमिंटन ], ब्रिज भूषण महंती [ बॉक्सिंग ] पी. ए. राफेल [ हॉकी ], संजोय चक्रवर्ती - नेमबाजी, रोशन लाल - कुस्ती.

* अर्जुन पुरस्कार - व्ही जे सुरेखा - तिरंदाजी, खुशबीर सिंग व अरोकीया राजीव - ऍथलेटिक्स, प्रशांती सिंग - बास्केटबॉल, लैशराम देवेंद्रो सिंग - बॉक्सिंग, चेतेश्वर पुजारा व हरमनप्रीत कौर - क्रिकेट, ओइनाम बेमबेम देवी - फुटबॉल, एस एस पी चौरासिया - गोल्फ, एस व्ही सुनील - हॉकी, जसवीर सिंग - कबड्डी, पी एन प्रकाश - नेमबाजी, ए अलमराज - टेबलटेनिस, साकेत मैनेनी - टेनिस, सत्यव्रत काडियन - कुस्ती, मारियाप्पन व वरून सिंग भाटी - पॅरालिंपियन.

* ध्यानचंद पुरस्कार - भूपेंदर सिंग - ऍथलेटिक्स, सईद शाहिद हकीम - फुटबॉल, सुमराय टेटे - हॉकी. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.