मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

महाराष्ट्र राज्यात पणन सुधारणा विधेयकाला मंजुरी - ९ ऑगस्ट २०१७

महाराष्ट्र राज्यात पणन सुधारणा विधेयकाला मंजुरी - ९ ऑगस्ट २०१७

*
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान १० गुंठे जमीनधारक सातबाराधारक जे शेतकरी बाजार समित्यांना गेल्या ५ वर्षात ३ वेळा शेतमाल पुरवठा करतात.

* अशा शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देणाऱे सुधारणा विधेयक मंगळवारी विधानसभेत गोंधळाने बहुमताने मंजूर झाले.

* बाजारसमित्यांसाठी मतदानास पात्र ठरणारा संबंधित शेतकऱ्यांची १० शेतजमीन असणे बंधनकारक आहे. त्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असायला हवी आहेत.

* तसेच लगतच्या ५ वर्षात त्या शेतकऱ्याने संबंधित कृषी बाजार समिती किमान ३ वेळा शेतमालाची विक्री केलेली असावी. या निकषात बसणारे व्यक्ती बाजारसमितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी समितीच्या निवडणुकीत आता मतदान करू शकणार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.