गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

सुनील अरोरा देशाचे नवे निवडणूक आयुक्त तर राजीव महर्षी नवे महालेखानियंत्रक म्हणून नियुक्ती - १ सप्टेंबर २०१७

सुनील अरोरा देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त तर राजीव महर्षी नवे महालेखानियंत्रक म्हणून नियुक्ती - १ सप्टेंबर २०१७

* केंद्र सरकारने आज प्रशासकीय सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले असून विविध विभागामध्ये एकूण १७ मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

* मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांची नेमणूक करण्यात आली असून नसीम झैदी जुलैमध्ये निवृत्त झाल्यावर हे पद रिक्त होते तर सध्या अचल कुमार ज्योती यांच्याकडे निवडणूक आयुक्तांचा कार्यभार होता.

* राजीव महर्षी यांची देशाच्या महालेखानियंत्रक [ CAG - Comptroller of Auditor General ] च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

* अनिता करवाल यांची सिबीएसई च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली सध्या राजेश कुमार चतुर्वेदी हे अध्यक्ष होते.

* राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी एन बैजन्द्रकुमार यांची नियुक्ती करण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.