शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

इस्रोने विकसित केले हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाईट - १३ ऑगस्ट २०१७

इस्रोने विकसित केले हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाईट - १३ ऑगस्ट २०१७

* भविष्यातील उपग्रहाच्या दृष्टीकोनातून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने प्रथमच परिपूर्ण असा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाईट [HySIS] विकसित केला आहे. हा उपग्रह सुमारे ६०० किमी दूर अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला जाईल.

* उपग्रहाची संरचना स्पेस अप्लिकेशन सेंटर अह्मदाबादने केली आहे. आणि इलेक्ट्रॉनिक चिप इस्रो च्या सेमी कंडक्टर प्रयोगशाळा चंदीगड येथे तयार केली आहे.

* पृथ्वीचे परिपूर्ण निरीक्षण करण्यासाठी हा उपग्रह अंतराळात सोडण्यात येत आहे. प्रक्षेपण योजना अजून निश्चित नाही.

* हायपर स्पेक्टरल इमेजिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून ६३० किमी दूरवरून ५५ स्पेक्ट्रल किंवा कलर बँडमधून पाहू शकतो.

* इस्रोने विकसित केलेली [ ऑप्टिकल इमेजिंग डिटेक्टर ऍरे ] म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर करून हा उपग्रह तयार करण्यात आला.

* हा उपग्रह लष्करी पाळतीसोबतच, पिके, तेल आणि खनिज शोध घेण्यासाठी वापरला जाईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.