शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

फ्रँकलिन वादळाचा मेक्सिकोला तडाखा - १३ ऑगस्ट २०१७

फ्रँकलिन वादळाचा मेक्सिकोला तडाखा - १३ ऑगस्ट २०१७

* मेक्सिकोच्या किनाऱ्यावर श्रेणी १ मध्ये मोडणाऱ्या फ्रँकलिन वादळाने १० ऑगस्ट रोजी धडक दिली आहे.

* साधारण ताशी ८५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह आलेले हे वादळ मध्य मेक्सिकोच्या डोंगराळ भागापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

* या वादळामुळे पूर्वेकडील किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना जोरदार पावसाचा आणि पुराचा तडाखा बसू शकतो.

* हे वादळ हळूहळू पश्चिमेस सरकत आहे. जसेजसे वादळ पश्चिमेला सरकेल तसे त्याची तीव्रता कमी होत जाईल.

* तसेच या वादळामुळे किनारी प्रदेशामध्ये सहा फूट उंचीपर्यंत लाटा निर्माण होऊ शकतात त्यामुळे नागरिकांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे.

* फ्रँकलिन हे या हंगामातील पहिले चक्रीवादळ आहे. २०१७ चा चक्रीवादळ हंगाम १ जूनला सुरु झाला, तो ३० नोव्हेंबर रोजी संपेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.