रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी घेण्यास नीती आयोगाची अनुकूलता - २८ ऑगस्ट २०१७

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी घेण्यास नीती आयोगाची अनुकूलता - २८ ऑगस्ट २०१७

* देशाच्या हितासाठी २०२४ पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकाचवेळी दोन टप्प्यात घेण्यास नीती आयोग अनुकूल आहे. 

* देशातील सगळ्या निवडणुका या प्रशासनाला कमीतकमी व्य्वत्यय आणताना निर्भय वातावरणात झाल्या पाहिजेत असे नीती आयोगाने नुकत्याच प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे. 

* २०२४ पासून आम्ही लोकसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात एकाचवेळी घेण्यासाठी काम सुरु करू शकतो त्यासाठी काही राज्यांच्या विधानसभांचा कालावधी किमान एका वेळेस तरी कमी करावा लागेल किंवा वाढवावा लागेल. 

* याची अंमलबजावणी देशाच्या हितासाठी करताना निवडणुकीशी संबंधित घटक घटनात्मक आणि निवडणुकांचे तज्ञ, वैचारिक संस्था, सरकारी अधिकारी, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी योग्य पद्धतीने अमलबजावणी व्हावी यासाठी एकत्र आले पाहिजे असे अहवाल म्हणतो. 

* या कामासाठी शिफारशींचा  विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला मध्यस्थ संस्था करण्यात आले आहे. त्याची मुदत मार्च २०१८ ठरवण्यात आली आहे. 

* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारतात निवडणूका एकत्र व्हाव्या यावर भर दिला आहे. 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.