मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले - ३० ऑगस्ट २०१७

उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले - ३० ऑगस्ट २०१७

* उत्तर कोरियाने राजधानी प्योगॉन्ग आज चाचणीसाठी सोडलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र थेट जपानच्या भूमीवरून झेपावत उत्तर पॅसिफिक महासागरात जाऊन कोसळले.

* अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या जपानवरून उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र सोडल्याने या भागात तणाव वाढण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

* जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चाळीस मिनिटे चर्चा केली.

* या क्षेपणास्त्राने २७०० किलोमीटरचा प्रवास केला. जपानच्या उत्तरेकडून होकाईदो बेटावरून आज पहाटे ६ वाजून २ मिनिटांनी साधारणपणे ५५० किलोमीटर उंचीवरून हे क्षेपणास्त्र ताशी १२००० हजार किलोमीटर वेगाने झेपावले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.