सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

जनधन योजनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत ६५ हजार कोटी रुपयाची भर - २९ ऑगस्ट २०१७

जनधन योजनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत ६५ हजार कोटी रुपयाची भर - २९ ऑगस्ट २०१७

* पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत गेल्या ३ वर्षात ३० कोटी कुटूंबियांनी जनधन खाती उघडली असून गरिबांनी या खात्यात तब्बल ६५ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात यामध्ये सांगितले.

* मन की बात कार्यक्रमात मोदी म्हणाले की २८ ऑगस्ट रोजी जनधन योजनेला ३ वर्षे पूर्ण झाली. या काळात आम्ही ३० कोटी गोरगरीब कुटुंबाना या योजनेशी जोडले आहे.

* त्याची खाती बँकात उघडण्यात आली आहेत. हा आकडा अनेक देशांच्या लोकसंख्येपैकी जास्त असू शकतो. या योजनेमुळे गरीब माणूस राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा भाग बनला आहे.

* गरीब लोक पैशाची बचत करू लागला आहे. पैशाच्या बचतीनुसार येणाऱ्या सुरक्षेचा अनुभव तो घेत आहे. मोदी म्हणाले की पैसा हातात असला की खर्च करण्याची इच्छा होते. आजचा जमाना काटकसरीचा आहे.

* गरिबांचे ६५ हजार कोटी ही त्यांची बचत नसून त्यांचे भविष्यकाळासाठीचे बळही आहे. पंप्रधान जीवन ज्योती बिमा, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, यासारख्या योजनांतून गरिबांना विम्याचे संरक्षण दिले जात आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.