रविवार, २० ऑगस्ट, २०१७

चीनबाबत परराष्ट्र धोरण आणि भारतापुढील पर्याय - २१ ऑगस्ट २०१७

चीनबाबत परराष्ट्र धोरण आणि भारतापुढील पर्याय - २१ ऑगस्ट २०१७

* सध्या सर्वत्र चीनविरोधी वातावरण आणि आपले परराष्ट्र धोरण याविषयी प्रसारमाध्यमात चर्चा सुरु आहे. मात्र भारत चीनदरम्यान डोकलाम वादावरून सुरु असलेल्या या अतिशयोक्ती चर्चेनंतरही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. 

* भारतीय लष्कर चीनसमोर टिकाव धरू शकेल काय या समस्येतून मार्ग काढण्याचा सर्वात वास्तववादी पर्याय कोणता? चीनचे परराष्ट्र धोरण हे परराष्ट्र संबंधांपेक्षा भौगोलिक विस्तारावर आधारलेले आहे. 

* चीनचे एकूण शेजारच्या १३ शेजारी देशांशी सीमावाद आहे. या सीमांची एकूण लांबी २२ हजार किमी आहे. 

* आशिया खंडातील आपला प्रभाव वाढविण्याचा चीनचा प्रयत्न असल्याने ते लष्करी आणि आर्थिक ताकद वाढवीत आहेत. 

* जागतिक स्तरावर भारताला कायम विरोध करत राहणे अशी धोरणे राबवून भारताला जागतिक पातळीवर अडचणीत आणून प्रादेशिक आणि जागतिक शक्ती म्हणून वर येऊ न देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. 

* चीनसह सर्व शेजारी देशासोबत शांततेचे संबंध राखण्यावर भारताने कायमच भर दिला आहे. १९६२ च्या युद्धानंतर राजीव गांधी दंग ज्वावपिंग यांच्यात १९८८ मध्ये झालेल्या चर्चेनंतर भारत चीन संबंधाने नवे वळण घेतले. 

* २००६ हे दोन्ही देशामध्ये मैत्रीचे वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले. २०१४ मध्ये भारत - चीनदरम्यान सीमासुरक्षा सहकार्य करार करण्यात आला. नेहरू ते मनमोहनसिंग यांच्यापर्यंत काँग्रेसच्या सर्व पंतप्रधानांनी चीनच्या धोरणात सातत्य ठेवले. 

* सध्या मात्र आपले चीनबाबतचे धोरण सैरभैर झालेले आहे. १९६२ च्या तुलनेत भारताची लष्करी आणि आर्थिक ताकद वाढली आहे. उलट चीन अनेक क्षेत्रात कायमच भारताच्या पुढे आहे. 

* जून २०१४ मध्ये मोदी यांनी चीनला मागे टाकण्यासाठी स्किल, स्केल, स्पीड, असा तीन एस फॉर्मुला सादर केला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही सर्व वादावर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. पण पुढे काहीच झाले नाही. 

* चीनला डोकलामपासून रोखण्याव्यतिरिक्त भारताला आणखी काह करणे आवश्यक आहे. भारताला उर्वरित आशियापासून तोडणे हा चीनचा उद्देश आहे. 

* भारताने अंतरराष्ट्रीय स्तरावर चीनबरोबरील संबंधाचा फेरविचार करणे. दुसरा पर्याय म्हणजे चीनबरोबरील व्यापारी संबंधात फेरविचार करणे. सध्या हा व्यापार चीनसाठी फायद्याचा असल्याने या संबंधाचा फेरविचार करणे. 

* मोदींनी चीनला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्याची संधी दिली. दीर्घकाळाच्या दृष्टीने आपण आर्थिक विकास घडवून आणत लष्करामध्येही आधुनिकता आणायला हवी. 

* चीनला शह देण्यासाठी जपान आणि तैवानबरोबर मैत्री वाढवायला हवी. भारताच्या अशांत ईशान्य भागात चीन हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे चीनबरोबरच्या परराष्ट्र धोरणात ईशान्य भारताचाही विचार करणे गरजेचे आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.