मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

शांतिपद चौधरी यांची सौर जागतिक संशोधन सांस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती - १५ ऑगस्ट २०१७

शांतिपद चौधरी यांची सौर जागतिक संशोधन सांस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती - १५ ऑगस्ट २०१७ 

* भारतीय विद्युत अभियंता शांतिपद गोन चौधरी यांची [ द इंटरनॅशनल सोलर इनोव्हेशन्स कौन्सिल या जागतिक संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

* ही संस्था नवीनच असून तिचे मुख्यालय फिनलँडमधील हेलसिंगी येथे आहे. जगातील गरीब देशांचे ऊर्जा प्रश्न अभिनव उत्तराच्या माध्यमातून सोडविण्याचा हेतू या संस्थेने ठेवला आहे.

* सौर ऊर्जांतज्ञ असलेले चौधरी हे पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठातून विद्युत अभियंता बनले आहेत.

* त्यांनी गेले २७ वर्षे पुनर्नवीकारणीय अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम केले आहे. तसेच अनेक शैक्षिणक व व्यवसायिक सरकारी संस्थांत त्यांनी ऊर्जा तज्ञ म्हणून काम केले आहे.

* देशातील पहिली सौर मीटर वीज दरप्रणाली तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते पश्चिम बंगाल हरित ऊर्जा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पश्चिम बंगाल सरकारचे ते विशेष ऊर्जा सचिवही होते.

* आशिया व आफ्रिका सौरउर्जेवर लक्ष केंद्रित करून तेथील ऊर्जा समस्या सोडवण्यावर त्यांचा भर आहे. ऊर्जा क्षेत्रातील ऑस्कर मानला जाणारा शास्वत ऊर्जेसाठीचा ब्रिटनमधील ऍशडेन पुरस्कार त्यांना २००३ मध्ये मिळाला आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.