गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

देशात स्टार्टअप उद्योगात महाराष्ट्राच आघाडीवर - २५ ऑगस्ट २०१७

देशात स्टार्टअप उद्योगात महाराष्ट्राच आघाडीवर - २५ ऑगस्ट २०१७

* केंद्र सरकारने सुरु केलेल्या स्टार्टअप इंडिया योजनेमध्ये सरकारने प्रमाणित केलेल्या स्टार्टअप उद्योग महाराष्ट्रातील असल्याचे ताज्या अहवालानुसार सांगण्यात आले.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर जानेवारी २०१६ ते ऑगस्ट २०१७ पर्यंत केंद्र सरकारने नऊ राज्यातील २८६५ स्टार्टअप प्रमाणित केले असून त्यापैकी ६० स्टार्टअप कर सवलती मंजूर केल्या आहेत.

* भारतातील राज्यानुसार प्रमाणित स्टार्टअप संख्या - महाराष्ट्र २५९, दिल्ली २१९, कर्नाटक १९७, तामिळनाडू १०२, गुजरात ७७, उत्तर प्रदेश ७६ स्टार्टअप प्रमाणित करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

* भारतात स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी अमर्याद संधी आहे. केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडियासारख्या उपक्रमामुळे प्रयोगशील नावीन्यशील उद्योगाचे मोठे दालन युवकांसाठी खुले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.