रविवार, २० ऑगस्ट, २०१७

डोकलामवाद प्रकरणी भारताला चीनविरोधात जपानची साथ - २१ ऑगस्ट २०१७

डोकलामवाद प्रकरणी भारताला चीनविरोधात जपानची साथ - २१ ऑगस्ट २०१७

* डोकलामवाद प्रश्नी चीनबरोबर सुरु असलेल्या वादात जपानने भारताला पाठिंबा दिला आहे.

* वादग्रस्त क्षेत्रात पूर्वीची स्थिती बदलण्याच्या प्रयत्न करू नये. अशा शब्दात जपानने चीनला ठणकावले आहे.

* सिक्कीम - तिबेट - भूतान - परिसरात असलेल्या डोकलाममध्ये चीनने रस्ता निर्मितीचा प्रयत्न केला आहे. हा परिसर भूतानचा आहे.

* तसेच सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील परिसर असलेल्या भारताने चिनी सैन्याला रस्ता बनवण्यापासून रोखले होते. त्यानंतर मागील दोन महिन्यापासून भारत आणि चीनचे सैन्य आमने सामने उभे आहेत.

* चीनने रस्त्याचे काम सुरु करून भुतानबरोबर झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप भारताने केला आहे. जपानच्या भूमिकेमुळे भारताला नैतिक समर्थन मिळाले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.