सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

तामिळनाडुतील अण्णा द्रमुक विभाजित दोन्ही गट एकत्र - २२ ऑगस्ट २०१७

तामिळनाडुतील अण्णा द्रमुक विभाजित दोन्ही गट एकत्र - २२ ऑगस्ट २०१७

* तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत कुरघोडीचा सामना करणाऱ्या अण्णा द्रमुक मधील दोन्ही गटांनी आज एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला.

* पक्षाच्या मुख्यालयात मुख्यमंत्री के पलानीस्वामी व बंडखोर नेते ओ पनीरसेल्वम यांनी हातमिळवणी करत दोन्ही गट एकत्र आल्याची घोषणा केली.

* दोन्ही गट पुन्हा एकत्र झाले आणि विलिनीकरणाच्या घोषणेनंतर काही वेळातच पलानीस्वामी यांनी पनीरसेल्वम यांची उपमुख्यमंत्री निवड केल्याचे जाहीर केले.

* अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या अनुषंगाने लवकरच पावले उचलली जातील. असे पक्षाचे ज्येष्ठ नेते आर वैथीलिंगम यांनी सांगितले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.