शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

पाकिस्तानच्या मदर टेरेसा डॉ रूथ फाऊ यांचे निधन - १२ ऑगस्ट २०१७

पाकिस्तानच्या मदर टेरेसा डॉ रूथ फाऊ यांचे निधन - १२ ऑगस्ट २०१७

* पाकिस्तानमधून कुष्ठरोग दूर करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या जर्मन डॉक्टर रूथ फाऊ वय [८५] वर्ष यांचे निधन झाले. पाकिस्तानच्या मदर टेरेसा म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.

* त्या १९६० मध्ये सर्वप्रथम पाकिस्तानमध्ये आल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांची हलाकीची परिस्थिती पाहून त्या हेलावून गेल्या आणि त्यांनी कुष्ठरोग्यावर उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता.

* नन असलेल्या डॉ फाऊ यांनी १९६२ मध्ये कराचीमध्ये मॅरी एडलेट लेप्रसी सेंटर स्थापन केले. आणि नंतरच्या काळात या संस्थेचा पाकिस्तानात सर्वत्र विस्तार केला. मुक्त होणाऱ्या पहिल्या काही देशामध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने १९९६ मध्ये जाहीर केले.

* डॉ फाऊ यांनी सोसायटी ऑफ डॉक्टर्स ऑफ हार्ट ऑफ मेमरी या संस्थेत प्रवेश केल्यानंतर त्यांना भारतात काम करण्यास सांगितले होते.

* त्यानं पाकिस्तानच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या हिलाल ए इम्तियाज १९७९ मध्ये तर हिलाल ए पाकिस्तान १९८९ मध्ये देण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.