सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

दीपक मिश्रा यांनी देशाच्या ४५ व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली - २९ ऑगस्ट २०१७

दीपक मिश्रा यांनी देशाच्या ४५ व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली - २९ ऑगस्ट २०१७

* न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी आज सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली. मिश्रा यांनी मावळते सरन्यायाधीश जे एस खेहर यांची जागा घेतली. 

* दीपक मिश्रा हे ४५ वे सरन्यायाधीश होत. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, नरेंद्रजी मोदी, सोनिया गांधी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

* सरन्यायाधीश होणारे दीपक मिश्रा हे ओडिशाचे तिसरे न्यायाधीश होत. त्यांचा कार्यकाळ २ ऑकटोम्बर २०१८ पर्यंत असणार आहे. 

* सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे काका रंगनाथ मिश्रा हे देखील सरन्यायाधीश होते. दीपक मिश्रा यांनी १९७७ मध्ये उडीसा उच्च न्यायालयात वकील म्हणून करिअरला सुरवात केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.