गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

आजपासून २०० रुपयाची नवीन नोट चलनात येणार - २५ ऑगस्ट २०१७

आजपासून २०० रुपयाची नवीन नोट चलनात येणार - २५ ऑगस्ट २०१७

* रिझर्व्ह बँकेकडून आज २०० रुपयाची नवीन नोट बँकांना वितरित करण्यात येणार आहेत. सध्या तरी नवीन नोटा एटीएम मधून मिळणार नाहीत काही कालावधीनंतर उपलब्द होतील.

[ २०० रुपयाच्या नव्या नोटेची वैशिष्टये ]

* छोट्या रकमेच्या नोटांची उपलब्द्ता वाढावी यासाठी तेजस्वी पिवळ्या रंगातील ही नोट चलनात आणण्यात येत आहे.

* नोट प्रकाशात धरल्यास पारदर्शक दिसेल. देवनागरी लिपीत २०० आकड्याची प्रतिमा नोटेवर असेल. नोटेवर मध्यभागी महात्मा गांधी यांची प्रतिमा असेल.

* आरबीआय, भारत, इंडिया, आणि २०० ही अक्षरे सूक्ष्म आकारात छापलेली असतील. सुरक्षा धाग्यात भारत आणि आरबीआय लिहिलेले असेल. नोट हलविल्यास धागा हिरवा आणि निळा या रंगात परिवर्तित होईल.

* महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूस हमी आणि वचनासह गव्हर्नरची स्वाक्षरी असेल. नोटेच्या खालच्या बाजूस उजवीकडे रंग बदलणारे रुपयाचे चिन्ह आणि २०० हा आकडा असेल.

* उजव्या बाजूस अशोकस्तंभाचे चिन्ह असेल. महात्मा गांधी यांचे चिन्ह इलेक्ट्रोटाईप २०० जलचिन्ह वॉटरमार्क असेल.

* नोटेच्या वर डाव्या बाजूला तसेच खाली उजव्या बाजूला मोठा होत जाणारा नोटेचा क्रमांक असेल. या नोटेची लांबी १४६ मिमी, तर रुंदी ६६ मिमी असेल.

* अंधांना नोट ओळखता यावी यासाठी महात्मा गांधी यांची प्रतिमा, अशोक स्तंभ, एच हे इंग्रजी अक्षर, चार कोनीय रेषा, आणि दोन वर्तुळे उंचवट्यात छापलेली असतील. नोटेला स्पर्श केल्यास ही चिन्हे हाताला जाणवतील.

* नोटेची मागील बाजू - डाव्या बाजूला वर्ष असेल. स्वच्छ भारत मोहिमेचे भारताचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य, सांचीच्या स्तूपाची प्रतिमा, विविध भाषांची सूची, देवनागरी लिपीत २०० हा आकडा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.