बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल - २४ ऑगस्ट २०१७

सर्वोच्च तलाकवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल - २४ ऑगस्ट २०१७

* अनेक महिन्यापासून चर्चेत असलेल्या तिहेरी तलाकच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

* या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप करण्यास नकार देत यासंबंधी ६ महिन्यात कायदा करावा असे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत.

* कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकवर ६ महिन्याची बंदी असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

* जर सहा महिन्यात सरकारने कायदा तयार केला नाही तर ही बंदी पुढे कायम राहील असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

* या प्रथेमुळे घटनेतील अनुच्छेद १४, १५, २१ आणि २५ चे उल्लंघन होत नसल्याचे मत सरन्यायाधीश जे एस खेहर आणि न्यायाधीश अब्दुल नाझीर यांनी मांडले.

[ तलाक परंपरा पद्धत ]

* तलाक हा सुन्नी समाजातील महत्वाची परंपरा असून गेल्या १००० वर्षांपासून ती सुरु आहे. याला तलाक - ए - बिद्दत असे म्हणतात.

* एकाच वेळी ३ वेळा तलाक बोलण्याच्या प्रथेला तलाक ए बिद्दत म्हणतात. इस्लामी विद्वानाच्या मते कुराणात अशा प्रकारची तलाक व्यवस्था नाही.

* मूळ व्यवस्थेत तलाक बोलण्यासाठी १ महिन्याचं अंतर असतं. या काळात पती आणि पत्नीमध्ये समेट होऊ शकतो.

* एकाच वेळी ३ वेळा तलाक बोलण्याची प्रथा पैगंबर मोहहम्द यांच्यानंतर सुरु झाली. अनेक इस्लामी देशात याला मान्यता नाही.

* पण भारतात आजही ही प्रथा कायम आहे. देशातील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी ७० % सुन्नी पंथातील उलेमा याला मान्यता देतात.

* १९३७ मध्ये मुस्लिम पर्सनल लॉ अप्लिकेशन करारांतर्गत सेक्शन २ मध्ये याची तरतूद आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.