सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

जगात इसिस सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना - २२ ऑगस्ट २०१७

जगात इसिस सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना - २२ ऑगस्ट २०१७

* इस्लामिक स्टेस्ट ऑफ इराक अँड सीरिया [ इसिस ] या दहशतवादी संघटनेचा इराक व सीरियातुन बिमोड झाला असला तरीही जगातील सर्वात धोकादायक संघटना म्हणून गेल्या वर्षापर्यंत तिची ओळख होती.

* मेरीलँड विद्यापीठाच्या अहवालामध्ये याची नोंद करण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

* या अहवालानुसार इसिस आणि इस्लामिक स्टेटने गेल्या वर्षी जगात एकूण चौदाशे हल्ले केले. त्यात सात हजार नागरिकांचा बळी गेला.

* गेल्या आठवड्यात स्पेनमध्ये लास रामब्लास येथे वर्दळीच्या ठिकाणी व्हॅन घुसवून इसिसने १३ नागरिकांना मारले.

* बांगलादेश, येमेन, लिबिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, आणि फिलिपिन्समध्ये इसिसच्या नेतृत्वाखाली अन्य दहशतवादी गट कार्यरत असून त्यांनी २०१६ मध्ये सर्वाधिक हल्ले केले असून, त्यातील बळींची संख्या पूर्वीपेक्षा मोठी आहे असे अहवालात म्हटले आहे.

* इसिस या दहशतवादी संघटनेकडून एक वर्षांपासून [ रूमिया ] हे मासिक प्रसिद्ध केले जाते. त्यात हल्ल्यासंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. एखाद्याला कसे भोसकायचे, वाहनांमधून हल्ला कसा करायचा याची माहिती असते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.