शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७

अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन नागपूरपर्यंत नेणार - २६ ऑगस्ट २०१७

अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन नागपूरपर्यंत नेणार - २६ ऑगस्ट २०१७

* अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेनचा विस्तार करून ती नागपूरपर्यंत नेण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी विशेष आग्रही आहेत. 

* मुंबई - नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल [ फिजिबिलिटी रिपोर्ट ] तयार करण्याचे काम सुरु असून तो ऑकटोम्बरपर्यंत येण्याची शक्यता आहे. 

* स्पेनची एक कंपनी हा अहवाल तयार करीत असून हा प्रकल्प आर्थिकदृष्टया ठरू शकतो, अशा निष्कर्षाप्रत ही कंपनी आली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

* मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी १० ते १२ तास लागतात जर बुलेट ट्रेन झाली तर दोन्ही शहराचे ८३६ किमी अंतर केवळ २ ते ३ तासात पूर्ण होणार आहे. तसेच मुंबई ते अहमदाबाद ६५० किमी अंतर केवळ २ तासात पूर्ण होऊ शकणार आहे. 

* राज्यात मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गचे काम चालू होणार असून बुलेट ट्रेन या महामार्गाच्याच समांतर असावी म्हणजे राज्याच्या आर्थिक विकासाला प्रचंड वेग येईल असा राज्य शासनाचा मुख्य हेतू आहे. 

* बुलेट ट्रेनचा मार्ग मुंबई-नाशिक-औरंगाबाद-अकोला-अमरावती-नागपूर असा असेल. समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेकट असून त्याला बुलेट ट्रेनची जोड मिळाली आहे. 

* अहमदाबाद मुंबईसह देशभरातील बुलेट ट्रेन प्रकल्पाची उभारणी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन करीत आहे. अहमदाबाद - मुंबई प्रकल्पाच्या उभारणीसाठी जपानच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. 

* अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या मुख्य उपस्थितीत सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अहमदाबाद येथे होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.