मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

फोर्ब्सच्या जगातील सर्वात १० श्रीमंताच्या यादीत शाहरुख ८ व्या क्रमांकावर - २३ ऑगस्ट २०१७

फोर्ब्सच्या जगातील सर्वात १० श्रीमंताच्या यादीत शाहरुख ८ व्या क्रमांकावर - २३ ऑगस्ट २०१७

* फोर्ब्स या प्रसिद्ध मासिकाने जगातील सर्वाधिक श्रीमंत कलाकारांची यादी प्रसिद्ध केली असून त्यात मार्क वहलबर्ग हा जगातील सर्वात श्रीमंत कलाकार ठरला असून तो यादीत प्रथम स्थानावर आहे.

* या यादीत भारताच्या कलाकारांपैकी पहिल्या दहा क्रमांकात शाहरुख खान ८ व्या स्थानावर असून त्याने वर्षाला २४३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सलमान खान ९ व्या स्थानावर असून वर्षाला २३७ कोटी रुपयांची कमाई केली. अक्षय कुमार १० व्या स्थानावर असून त्याने वर्षाला २२७.५ कोटी रुपयाची कमाई केली आहे.

* या यादीत अमीर खानचे नाव नाही. विशेष म्हणजे दंगल चित्रपटाने भरगोस कमाई केली असून त्याचे नाव या यादीत नाही. याचे कारण मासिकाने १ जून २०१६ पासून ते १ जून २०१७ या १२ महिन्याच्या कालावधीचा अभ्यास केला आहे.

* अभिनेत्रींच्या यादीत  ला ला लँड चित्रपटातील नायिका एमा स्टोन यावर्षी जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री ठरली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.