सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

माता मृत्यूच्या संख्येत ठाणे जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर - १४ ऑगस्ट २०१५

माता मृत्यूच्या संख्येत ठाणे जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर - १४ ऑगस्ट २०१५

* राज्य सरकार विविध योजना राबवत असल्याने माता मृत्यूच्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येत असले तरी, आरोग्य विभागाला अपेक्षित यश प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही.

* माता मृत्यूच्या संख्येत नागपूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर तर ठाणे जिल्हा प्रथम क्रमांकावर असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे.

* राज्यात २०१६-१७ या वर्षात १ हजार १९२ मातामृत्यू झाले आहेत. माता मृत्यूचे प्रमाण हे सुधारित व सुशिक्षित शहरापेक्षा मागासलेले म्हणून ओळखले जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये कमी दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

* सध्या १ लाख गर्भवतीमध्ये हे प्रमाण ७० एवढे आहे. २०१७ पर्यंत हे प्रमाण ४७ वर आणण्याचे ठरले आहे. तर २०३० पर्यंत हे प्रमाण १९ एवढे कमी ठेवण्यात आले आहे.

* माता मृत्यूची प्रमुख कारणे - जोरदार रक्तस्त्राव होणे, धार्मिक परंपरा व रूढी, गर्भाची गुंतागुंत, सकस आहाराचा अभाव, उच्च रक्तदाब, अठरा वर्षाच्या आतील गरोदर महिला, प्रथम सीझर, रक्तक्षय, मधुमेह, योग्य आरोग्य सोयीचा अभाव ही आहेत.

* प्रत्येक प्रसूती ही रुग्णालयातच व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासनातर्फे जननी सुरक्षा योजना राबविली जात आहे.

* अनुसूचित जाती जमाती, व भटक्या तसेच दारिद्र्य रेषेखालील गर्भवती महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास या योजेनेअंतर्गत ७०० रुपये तर शहरातील रुग्णालयामध्ये प्रसूती झाल्यास ६०० रुपये दिले जातात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.