मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

अर्थतज्ञ राजीव कुमार नीती आयोगाचे नवे उपाध्यक्ष - ९ ऑगस्ट २०१७

अर्थतज्ञ राजीव कुमार नीती आयोगाचे नवे उपाध्यक्ष - ९ ऑगस्ट २०१७

* नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थज्ञानी डॉ राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ अरविंद पानघडिया यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने राजीव कुमार यांना संधी दिली.

* १ ऑगस्ट रोजी पानगढिया यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. ३१ ऑगस्ट रोजी ते आयोगातील पदभार सोडतील.

* डॉ कुमार हे सध्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च येथे कार्यरत आहेत. अर्थविषयक पुस्तकांचे लिखाणही त्यांनी केले होते.

* लखनौ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले असून २००६ ते २००८ या कालावधीत ते केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्यदेखील होते.

* एशियन डेव्हलपमेंट बँक, अर्थ आणि उद्योग मंत्रालयातील कामाचा दांडगा अनुभव आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.