शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

जग्वार या लढाऊ विमानात आता आधुनिक रडार - १३ ऑगस्ट २०१७

जग्वार या लढाऊ विमानात आता आधुनिक रडार - १३ ऑगस्ट २०१७

* हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएल या कंपनीने जग्वार या लढाऊ विमानाची निर्मिती करताना त्यात प्रथम अत्याधुनिक एईएसए रडार तंत्रज्ञान वापरले आहे.

* या नव्या रडारमुळे जग्वार लढाऊ विमानाकडे दुसऱ्या रडारला अडचणी निर्माण करत लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.

* या रडारमुळे शत्रूच्या ठिकाणांची अचूक माहिती मिळण्यास आणि उध्वस्त करण्यास मदत होणार आहे.

* एचएएल कंपनीने भारतीय वायुदलासाठी जग्वार ड्रेन थ्रीची निर्मिती करताना इंटरलिव्ह मोड ऑफ ऑपरेशन हाय ऍक्यूरसी अँड रिझोल्युशन अशा अनेक प्रणाली विकसित करण्यात  आल्या आहेत.

* एचएएल इस्रायलमधल्या एका फार्मच्या मदतीने हे रडार तयार केले गेले. या रडारमुळे लढाऊ विमान एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदू शकतो.

* आतापर्यंत भारताच्या एकही लढाऊ विमानात रडार नव्हते. या नव्या तंत्रज्ञानमुळे भारतीय वायुदलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.

* भविष्यात राफेल आणि बोईंगच्या नव्या लढाऊ विमानामध्येही या रडारचा वापर करण्यात येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.