शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

राज्यात २४ जलदगती न्यायालये स्थापणार - २० ऑगस्ट २०१७

राज्यात २४ जलदगती न्यायालये स्थापणार - २० ऑगस्ट २०१७

* राज्यात खून, बलात्कार, दरोडा, अनैतिक मानवी वाहतूक, हुंडाबळी, सायबर क्राईम, आदी गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे गुन्हे सिद्ध होऊन दोषींना शिक्षा होण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो. हे टाळण्यासाठी राज्यात २४ ठिकाणी जलदगती न्यायालये सरकार स्थापन करणार आहे.

* यासाठी केंद्र सरकारने २०१५ ते २०२० या कालावधीसाठी १०१४ कोटी इतका निधी देण्याचे मान्य केले आहे. या अंतर्गत २४ ठिकाणी जलदगती न्यायालये स्थापन करून न्यायधीश, लघुलेखक, लिपिक, शिपाई असे १४४ पदे मंजूर करण्यात आली आहेत.

* न्यायालये स्थापन होणारी राज्यातील ठिकाणे - लातूर, रत्नागिरी, बीड - माजलगाव, बीड, मुंबई, अमरावती, परभणी, पुणे खेड, अहमदनगर - संगमनेर, नेवासा, बुलढाणा - खामगाव, ठाणे - कल्याण, कल्याण एक, ठाणे, नांदेड, मुखेड, रायगड - पनवेल, सातारा - कराड, उस्मानाबाद - भूम, वाशीम - मंगरुळपीर, भंडारा, अहमदनगर, यवतमाळ या ठिकाणी जलदगती न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.