सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

देशातील जेईई ऍडव्हान्स आणि मेन्स परीक्षा २०१८ पासून पूर्ण ऑनलाईन - २२ ऑगस्ट २०१७

देशातील जेईई ऍडव्हान्स आणि मेन्स परीक्षा २०१८ पासून पूर्ण ऑनलाईन - २२ ऑगस्ट २०१७

* देशभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आयआयटी आणि देशभरातील इंजिनिअरिंग कोर्सेसच्या ऍडमिशनच्या साठी घेतली जाणारी जेईई ऍडव्हान्स आणि मेन्स परीक्षा २०१८ शैक्षणिक वर्षांपासून पासून पूर्ण ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

* असा निर्णय संयुक्त मंडळाने [ जेएबी ] रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. असे आयआयटी मद्रासचे संचालक आणि जेएबी २०१७ चे अध्यक्ष प्रा भास्कर राममूर्ती यांनी दिली.

* देशभरातील इंजिनिअरिंग कोर्सेसच्या ऍडमिशनसाठी जेईई मेन्स ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. आयआयटी किंवा एनआयटी प्रवेशास पात्र ठरण्यासाठी जेईई ऍडव्हान्स ही परीक्षा आहे.

* ही परीक्षा ऑनलाईन करण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरु होते, मात्र पुरेशा पायाभूत सुविधांअभावी हे राखडलं होत.

* या वर्षी १३ लाखापेक्षा जास्त विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षेला बसले होते. अंदाजे २.२ लाख विद्यार्थी जेईई ऍडव्हान्ससाठी पात्र ठरले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.