शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष - १२ ऑगस्ट २०१७

प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष - १२ ऑगस्ट २०१७

* सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरून हटवण्यात आले. आणि त्या जागी प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. 

* पहलाज यांनी बोर्डाची ३ वर्ष जबाबदारी सांभाळली आहे. या तीन वर्षात त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली. त्याशिवाय त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयावर टीकाही झाली. 

* प्रसून जोशी हे बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे आघाडीच्या गीतकारामध्ये त्यांची गणना होते. 

* त्यांना आतपर्यंत ३ वेळा फिल्मफेअर, दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी अनेक बॉलिवूडमध्ये गीतलेखनासह संगीत दिग्दर्शनही केले. 

* तारे जमीन पर या सिनेमातील माँ या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना २०१५ मध्ये पदमश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.