मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

राज्यातील सरपंचपदासाठी नवीन खर्चमर्यादा निश्चित - २३ ऑगस्ट २०१७

राज्यातील सरपंचपदासाठी नवीन खर्चमर्यादा निश्चित - २३ ऑगस्ट २०१७

* ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीतील उमेदवारासाठी ग्रामपंच्यातीच्या सदस्यसंख्येनुसार ५० हजार ते १ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

* तसेच सदस्यपदाच्या निवडणुकीतील उमेदवारासाठी २५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत सुधारित खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी सांगितले.

* महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार आता सरपंचपदासाठी थेट निवडणूक घेण्यात येणार आहे. सरपंचपदाच्या उमेदवारासाठी राज्य निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा निश्चित केली आहे.

* ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांची खर्चाची मर्यादा पुढीलप्रमाणे आहे.

* ७ ते ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत सदस्यास २५ हजार तर सरपंचास ५० हजार.

* ११ ते १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत सदस्यास ३५ हजार तर सरपंचास १ लाख.

* १५ ते १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत सदस्यास ५० हजार तर सरपंचास १ लाख ७५ हजार. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.