गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

नोटबंदीनंतर भारताचा तिमाहीत जीडीपी दर ५.७% - १ सप्टेंबर २०१७

नोटबंदीनंतर भारताचा तिमाहीत जीडीपी दर ५.७% - १ सप्टेंबर २०१७ 

* नोटबंदीचा परिणाम आणि उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीचा फटका विकासकाला बसला आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची केवळ ५.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

* सलग तिसऱ्या तिमाहीत विकासदर खुंटला असून चीनपेक्षा खाली गेला आहे. जीडीपीचा गेल्या तीन वर्षातील हा नीचांकी दर आहे. 

* केंद्रीय सांख्यिकी विभागाने गुरुवारी आर्थिक आकडेवारी जाहीर केली. जानेवारी ते मार्च या तिमाहीच्या तुलनेत जीडीपी वाढेल अशी अपेक्षा आहे. 

* २०१६ -१७ मधील जिडीपी दर ७.९% होता. असे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कारखाना उत्पादन १०.७% होते. ते १.२ टक्क्यापर्यंत घसरले आहे. कृषी उत्पादन २.३% पर्यंतखाली आले आहे. 

* अर्थव्यवस्थेतील ८ प्रमुख पायाभूत क्षेत्राची जुलैअखेरीस कामगिरी खालावली आहे. ८ पैकी पाच औद्योगिक क्षेत्रामधील उत्पादन उणे नोंदविण्यात आले आहे. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.