बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

२०० रुपयाची नवी नोट चलनात येणार रिझर्व्ह बँक - २४ ऑगस्ट २०१७

२०० रुपयाची नवी नोट चलनात येणार रिझर्व्ह बँक - २४ ऑगस्ट २०१७

* २०० रुपयांच्या दर्शनी मूल्याची नोट चलनात आणण्यास रिझर्व्ह बँकेस अधिकार देणारी अधिसूचना केंद्र सरकारने बुधवारी जारी केली असून अशी नोट चलनात येणार आहे.

* २०० रुपयाच्या नोटेची छपाई सुरु झाली असून सप्टेंबरमध्ये नवीन नोट बाजारात दाखल होणार आहे.

* २०० रुपयाच्या नोटांचा निर्णय प्रामुख्याने ३ कारणासाठी घेण्यात आला. नोटबंदीनंतर आणलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांची साठेबाजी आणि काळाबाजार यास आळा घालणे व पुरेसे चलन उपलब्द करणे.

* तसेच १०० व ५०० रुपयाची नोट आणून व्यवहार सुलभ करणे. तर २०० रुपये मूल्याच्या किमान ५० कोटी नोटा नजीकच्या भविष्यात चलनात आणण्याचा विचार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.