गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अखेर उलगडा - १८ ऑगस्ट २०१७

पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अखेर उलगडा - १८ ऑगस्ट २०१७

* पृथ्वीवर पहिला प्राणी कशा प्रकारे अस्तित्वात आला याचे रहस्य उलगडण्यात संशोधकांना यश आले आहे. मानवी अस्तित्वाच्या पृथ्वीवरील शोध लागण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल पडले आहे.

* ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमधील [ एएनयू ] संशोधकांनी मध्य ऑस्ट्रेलियातील पुरातन खडकांचे संशोधन केले.

* यात पृथ्वीवरील प्राणी उत्क्रांत होण्यास शेवाळापासून ६५ कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाल्याचे समोर आले आहे. एएनयू मधील सहयोगी प्राध्यापक जोचेन ब्रॉक्स म्हणले की आम्ही या खडकांची पावडर तयार केली. या पावडरमधून काही प्राचीन अवशेषांचे रेणू सापडले.

* या रेणूच्या संशोधनातून जीवसृष्टीतील उत्क्रांती अवस्था ६५ कोटी वर्षांपूर्वी सुरु झाल्याचे समोर आले आहे. पहिल्यांदा शेवाळापासून ही उत्क्रांती सुरु झाली.

* पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात मोठी उत्क्रांती शेवाळापासून सुरु झाली. या उत्क्रांती प्रक्रियेशिवाय मानव आणि प्राण्यांचे अस्तित्व शक्यच नव्हते. असे संशोधन पत्रिका नेचर मध्ये संशोधन प्रसिद्ध झाले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.