गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

जागतिक क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या संजीवन जाधवला रौप्यपदक - २५ ऑगस्ट २०१७

जागतिक क्रीडा स्पर्धेत नाशिकच्या संजीवन जाधवला रौप्यपदक - २५ ऑगस्ट २०१७

* भारताची उदयोन्मुख ऍथलेटिक्सपटू संजीवनी जाधवने २९ व्या जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली आहे.

* नाशिकची २० वर्षीय धावपटू संजीवनने भुवनेश्वरमध्ये जुलै महिन्यात झालेल्या आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील ५ हजार मीटर स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

* जागतिक शालेय ऑलिम्पियाड स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या संजीवनच्या कारकिर्दीतील हे दुसरे महत्वाचे पदक आहे. किर्गिस्तानच्या दारिया मास्लोव्हाने ३३ मिनिटे, १९.१७ सेकंड या वेळेसह सुवर्णपदक पटकावले.  तर दुसऱ्या क्रमांकावरील संजीवन ३३ मिनिटे आणि २२ सेकंदात शर्यत पूर्ण केली आहे.

* प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ऍथलेटिक्स धडे गिरवण्यापूर्वी संजीवनने कुस्ती या खेळात स्वतःला अजमावताना जिल्हास्तरीय स्पर्धेमध्येही भाग घेतला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.