गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

बिल गेट्सचे आतापर्यंतचे २९ हजार ५७१ कोटी रुपयाचे सर्वात मोठे दान - १८ ऑगस्ट २०१७

बिल गेट्सचे आतापर्यंतचे २९ हजार ५७१ कोटी रुपयाचे सर्वात मोठे दान - १८ ऑगस्ट २०१७

* मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टमधील त्यांच्या मालकीचे शेअर्स दान केले आहेत. या शेअर्स मूल्य गेट्स यांच्या एकूण संपत्तीच्या ५% इतके आहे.

* गेट्स यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टचे ६ कोटी ४० लाख शेअर्स दान केले आहेत. त्याचे भारतीय मूल्यांकन २९ हजार ५७१ कोटी रुपये एवढे आहे.

* यातील बहुतांश दान त्यांनी त्यांचा बिल आणि मिलिंडा फाउंडेशन याला दिले आहे. गेट्स दाम्पत्याने समाजकार्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे.

* या संस्थेला बिल आणि गेट्स कडून तब्बल २.२४ लाख कोटी रुपये एवढे दान मिळाले आहे. याआधी १९९९ मध्ये गेट्स यांनी शेअर्सच्या स्वरूपात १६ अब्ज डॉलरचे [ १ लाख कोटी रुपये ] एवढे दान केले होते.

* वॉरेन बफेट यांच्यासोबत गेट्स यांनी २०१० मध्ये गिव्हिंग्स प्लेजची स्थापना केली. तेव्हापासून १६८ धनाढ्य लोक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

* या दानशूर व्यक्तींनी स्वतःच्या संपत्तीतील जास्तीत जास्त रक्कम समाजकार्यासाठी देण्याची शपथ घेतली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.