मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

महाराष्ट्रातील नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अकोला ते हैद्राबाद - २२ ऑगस्ट २०१७

महाराष्ट्रातील नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अकोला ते हैद्राबाद - २२ ऑगस्ट २०१७

* महाराष्ट्रातील नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अकोला ते हैद्राबाद राष्ट्रीय चौपदरी महामार्ग [ NH १६१ ] निर्मितीला वेग आला असून आगामी २०१८ च्या मार्च अखेरीस निविदा निघून काम सुरु केले जाईल. 

* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ हा महामार्ग महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडला जाईल. या मार्गावरील गावांचा दळणवळणाच्या व्यवसायिक दृष्टीने विकास होणार आहे. 

* अकोला - पातूर - वाशीम - हिंगोली - नांदेड - देगलूर - संगारेड्डी - हैद्राबाद या शहरांना हा महामार्ग जोडल्या जाईल किंवा या शहरातून जाईल. हा महामार्ग महाराष्ट्रातील अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, आणि तेलंगणातील कामारेड्डी आणि संगारेड्डी या जिल्ह्यातून जाणार आहे. 

* देशातील दळणवळणाचे जाळे अधिक विकसित करण्याच्या दृष्टीने अकोला ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

* अकोल्यापासून संगारेड्डीपर्यंत ४३० किलोमीटर अंतराचा चौपदरी मार्गाच्या निर्मितीसाठी डिटेल प्रोजेकट रिपोर्ट तयार झाला असून लवकरच कामाला सुरवात होणार आहे. 

* या महामार्गाचा सर्वाधिक फायदा मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना होणार असून राज्यातील मागास भागाचा विकास होणार आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.