रविवार, २० ऑगस्ट, २०१७

संयुक्त राष्ट्राचा मिनामाटा कराराची अंमलबजावणी सुरु - २० ऑगस्ट २०१७

संयुक्त राष्ट्राचा मिनामाटा कराराची अंमलबजावणी सुरु - २० ऑगस्ट २०१७

* संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण कार्यक्रमाचा [UNEP] पाठिंबा असलेला पारा [ Mercury ] संदर्भात [ मिनामाटा करार हा वैश्विक करार जागतिक पातळीवर लागू झाला.

* पाऱ्यामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य मेंदूविषयक आणि आरोग्यास नुकसानीपासून लाखो लहान मुलांचे आणि अभ्रकांचे संरक्षण करण्याकरिता या करारांतर्गत प्रयत्न केले जातील.

* पर्यावरण आणि आरोग्य संबंधित हा प्रथम वैश्विक करार आहे. या करारावर आजपर्यंत १२८ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

* करारामध्ये सहभागी झालेले देशाचे सरकार आता मानवी आरोग्याच्या आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने पाऱ्यासंबंधित विविध उपाययोजना अमलात बंधनकारक आहे.

* पारा हा पदार्थ अविनाशी असल्याने पाऱ्याची अंतरिम साठवणूक आणि त्याच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात अटी निश्चित केल्या आहेत.

* कराराला मिनामाटा हे नाव इतिहासातील सर्वात गंभीर पाऱ्याच्या विषबाधेच्या घटनेवरून मिळालेले आहे. १९५६ साली जपानमधील मिनामाटा उपसागरातील माशांच्या खाण्यापासून स्थानिक गावांना आरोग्यासंबंधी बाधा झाल्या.

* पाऱ्याचे प्रदूषण काही मानवनिर्मित स्रोतामधून होतो. जसे क्लोरीन आणि काही प्लॅस्टिकची निर्मिती, सांडलेला कचरा आणि प्रयोगशाळेमध्ये पाऱ्याचा वापर, औषधोत्पादन, प्रिजर्व्हेटिव्ह, रंग, आणि दागिने, पाऱ्यासाठी कोणताही सुरक्षित स्तर नाही तसेच पाऱ्याच्या विषबाधेवर उपायसुद्धा नाही.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.