गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

हिजबुल मुजाहिद्दीनला दहशतवादी संघटना म्ह्णून घोषित - १७ ऑगस्ट २०१७

हिजबुल मुजाहिद्दीनला दहशतवादी संघटना म्ह्णून घोषित - १७ ऑगस्ट २०१७

* काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्ह्णून घोषित केले आहे.

* अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी करार अंतर्गत हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

* संघटनेचा म्होरक्या सईद सल्लाउद्दीन जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतरच्या दोनच महिन्यानंतर अमेरिकेने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले. त्यामुळे वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया उजेडात आणणाऱ्या भारताच्या प्रयत्नांना यश आले आहे.

* यामुळे आता हिजबुल मुजाहिद्दीन सर्व हालचालीवर आता निर्बंध येणार आहेत. याशिवाय य दहशतवादी संघटनेत कोणालाही सामिलदेखील होता येणार नाही.

* अमेरिकेच्या या निर्णयामुळे हिजबुल मुजाहिद्दीनची फार मोठी कोंडी झाली आहे. १९८९ मध्ये स्थापन झालेली ही संघटना अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्या कारवाया करत आहे. आणि या संघटनेचे अनेक दहशतवादी काश्मीरमध्ये सहभागी आहेत.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.