मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

कोरीनअँड्रॉ इलिग्नस फुलझाडाचा शोध - १५ ऑगस्ट २०१७

कोरीनअँड्रॉ इलिग्नस फुलझाडाचा शोध - १५ ऑगस्ट २०१७

* राजापूर तालुक्यात पावसाळ्यात डबक्यामध्ये उगवणाऱ्या [ कोरीनअँड्रॉ इलिग्नस चांदोरे ] या फुलझाडांचा शोध डॉ एस आर यादव, व डॉ उषा यादव यांच्या दोन वर्षाच्या अथक परिश्रमाने त्यांनी लावला.

* ही फुलझाडे राजापूर तालुक्यातील साखरकोंबे, जैतापूर, नाटे परिसरातून ते थेट देवगड तालुक्यापर्यंत आढळळी.

[ फुलाची वैशिट्ये ]

* फुलांची लांबी ५ ते ९ सेमी, २५० पर्यंत पुंकेसर, एकच स्त्रीकेसर, झाडाची उंची २ मीटर, पाकळीची लांबी अडीच ते साडेचार सेमी, फुलांचा हंगाम जुलै ते नोव्हेंबर, मोहरीच्या कुळातील वनस्पती.

* सदाबहार आणि लक्ष वेधून घेणाऱ्या कोरीनअँड्रॉ इलिग्नस या फुलझाडाचा संशोधित वनस्पती म्हणून जागतिक स्तरावर ९ मे २०१६ रोजी न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅकसा या जागतिक दर्जाच्या या नियतकालिकाने नोंद केली आहे.

* त्या नियतकालिकाच्या मुखपृष्ठासह वेबसाईटवर फुलाची छबी आहे. बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया या पुस्तकांमध्येही संशोधित नवी वनस्पती म्हणून नोंद झाली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.