सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

अंटार्टिकावर सापडले वन्यजीवांचे अस्तित्व - १४ ऑगस्ट २०१७

अंटार्टिकावर सापडले वन्यजीवांचे अस्तित्व - १४ ऑगस्ट २०१७

* भारतापेक्षा ३ पट मोठ्या असणाऱ्या अंटार्टिका खंडावरील प्राणीजीवांबाबत जगभरातील संशोधकांना कुतूहल असते. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने [ WII ] केलेल्या संशोधनात अंटार्टिकावर वन्यजीवांचे अस्तित्व सापडले असून यात ५ प्रकारचे सेल्स [ बर्फाळ प्रदेशातील प्राणी ], पाच प्रकारचे समुद्री पक्षी आणि पेगवीनच्या दोन प्रजाती आढळून आल्या.

* भारताच्या भारती या अभ्यास केंद्रानजीक स्नो पेट्रल जातीच्या पक्षांची अनेक घरटी सापडलेली आहेत. अंटार्टिकावरील समुद्री जीव संख्या आणि सस्तन प्राण्यांच्या संख्येचा आकडा प्राप्त करण्यासाठी [ WII ] यश मिळाल्याचे वरिष्ठ संशोधक डॉ अनंत पांडे यांनी सांगितले.

* आजपर्यंत [ WII ] ने भारतीय संशोधकांच्या मोहिमेअंतर्गत १९९० पासून आठ वेळा प्राणी जगतावर जीवन शैलीत आणि संख्येत बदल होणाऱ्या नोंदी जमा केल्या आहेत.

* यात २३ वर्षापेक्षा जास्त वर्षांपासूनच्या येथील जगताच्या जीवनशैलीत आणि संख्येत बदल होणाऱ्या नोंदी जमा केल्या आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.