रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

हार्दिक पांड्याचे क्रिकेटमधील विक्रम - १४ ऑगस्ट २०१७

हार्दिक पांड्याचे क्रिकेटमधील विक्रम - १४ ऑगस्ट २०१७

* श्रीलंकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांची बॅट तळपली आणि टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याने सर्वाधिक आक्रमक शतकी खेळी केली.

* या खेळीसोबत त्याने अनेक विक्रमही मोडीत काढले. हार्दिक पांड्याचे विक्रम खालीलप्रमाणे.

* एका षटकात २६ धावा ठोकून त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. कसोटीमध्ये एका षटकात २६ धावा ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्या नावावर कसोटीत एका षटकात सर्वाधिक २४ धावा ठोकण्याचा विक्रम होता.

* पंड्याने पहिल्या ५० धावा ६१ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. तर नंतरच्या ५० धावा केवळ २५ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. यामध्ये एकाच षटकात २६ धावा ठोकल्यामुळे पंड्याने जलद शतक पूर्ण केले.

* चहापाण्यापर्यंत १०७ धावा ठोकणारा हार्दिक पंड्या पहिलाच भारतीय खेळाडूं आहे. चहापाण्याच्या अगोदर पंड्याने शतक पूर्ण केलं होत.

* यापूर्वी वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिज विरुद्ध २००६ साली चहापाण्यापर्यंत ९९ धावा पूर्ण केल्या होत्या.

* पंड्याने कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक पूर्ण केले.

* आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात वेगवान शतक पूर्ण करणाराही तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.

* या वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत तो ४ थ्या क्रमांकावर आहे. त्याच्या आधी प्रथम स्थानी डॉन मॉर्गन ३३ षटकार, एव्हीन लेविस ३२ षटकार दुसऱ्या स्थानी, बेन स्टोक ३ ऱ्या स्थानी २७ षटकार तर हार्दिक पंड्या २६ षटकार चौथ्या स्थानी.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.