शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

राज्यात दुकाने, चित्रपटगृहे २४ तास खुले राहणार - १२ ऑगस्ट २०१७

राज्यात दुकाने, चित्रपटगृहे २४ तास खुले राहणार - १२ ऑगस्ट २०१७

* दुकाने, निवासी हॉटेल, उपहारगृहे, चित्रपटगृह, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे २४ खुली ठेवण्याची तरतूद असलेले विधेयक आज विधानसभा परिषदेत मंजूर करण्यात आले.

* सध्याच्या वाढत्या स्पर्धेच्या काळात लहान मोठ्या दुकानांसह मॉलचा टिकाव लागावा यासाठी वेळेचे निर्बंध ठरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, याबाबच्या विधेयकाला आज विधान परिषदेने मंजुरी दिली.

* ऑनलाईन शॉपिंगच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ झाली असून त्याचा फटका किराणा दुकानापासून मोठ्या मॉल पर्यंत बसला आहे.

* त्यामुळे दुकाने, निवासी हॉटेल, उपहारगृहे, चित्रपटगृहे, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे २४ तास खुली ठेवण्यात येणार आहेत.

* नव्या विधेयकानुसार महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या परवानगीने रात्री ९.३० नंतर सकाळी ७ वाजेपर्यंत काम करण्याची देण्यात आली आहे.

* मात्र महिलांना सुरक्षितता आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणे सक्तीचे करण्यात आले आहे.

* रात्री काम करणाऱ्या या महिलांना त्यांच्या निवासस्थानापासून नेआण करण्याची अट विधेयकात घालण्यात आली आहे.



0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.