शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

डेरा सच्चा सौदाप्रमुख बाबा राम रहीम बलात्काराच्या प्रकरणी दोषी म्हणून जाहीर - २६ ऑगस्ट २०१७

डेरा सच्चा सौदाप्रमुख बाबा राम रहीम बलात्काराच्या प्रकरणी दोषी म्हणून जाहीर - २६ ऑगस्ट २०१७

* डेरा सच्चा सौदाप्रमुख बाबा राम रहीम यांना बलात्काराच्या आरोपाबद्दल सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवताच पंजाब व हरियाणात त्याच्या समर्थकांनी ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक केली.

[ डेरा सच्चा सौदाप्रमुख बाबा राम रहीमचे वाद ]

* २००१ - मध्ये साध्वीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप.

* २००२ - मध्ये पत्रकार रामचंद्रच्या हत्येचा आरोप.

* २००३ - डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजित सिंह यांच हत्याकांड.

* २००७ - गुरु गोविंद सिंह यांच्या वस्त्रावरून शिखासोबत वाद.

* २०१० - डेराचे माजी व्यवस्थापक फकीर चंद बेपत्ता केल्याचा आरोप.

* २०१२ - डेरा सच्चा सौदाच्या ४०० साधूंना नपुसंक केल्याचा आरोप.

[ डेरा सच्चा सौदाप्रमुख बाबा राम रहीमचा इतिहास ]

* १९६७ मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शीख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहिमला तत्कालीन डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी २३ सप्टेंबर १९९० मध्ये आपला वारस घोषित केले.

* वयाच्या २३ व्या वर्षी बाबा राम रहीम डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनला. यानंतर बाबा राम रहीम यांच्या नेतृत्वात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनला.

* यानंतर बाबा राम रहीम यांच्या नेतृत्वात डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता वाढू लागली. बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदा सामाजिक एकोपा, नाशामुक्ती आणि मानवेतेपासून सर्वधर्म समभावचा संदेश देता. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे.

* डेरा सच्चा सौदा आश्रम सुमारे ६८ वर्षांपासून सुरु आहे. डेरा सच्चा सौदाच साम्राज्य देश परदेशात पसरलं आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, युएई पर्यंत डेरा सच्चा सौदाचे भक्त आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.