शुक्रवार, ७ जुलै, २०१७

MPSC आयोग घोषणा परीक्षांना वेळेवर उपस्थितीबाबत - ८ जुलै २०१७

MPSC आयोग घोषणा परीक्षांना वेळेवर उपस्थितीबाबत - ८ जुलै २०१७

* आयोगामार्फत आयोजित परीक्षांचे सवेंदनशील स्वरूप लक्षात घेऊन, परीक्षा कक्षामध्ये विहित केलेल्या वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जात नाही.

* आयोगामार्फ़त आयोजित परीक्षा या सर्वसाधारणपणे शहरी भागात घेतल्या जातात. काही वेळा शहरी भागातील मोर्चे, आंदोलने, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे, अतिवृष्टी, सार्वजनिक वाहतुकीचा खोळंबा इत्यादी बाबी लक्षात घेऊन.

* परीक्षेच्या दिवसासाठी प्रवासाच्या कालावधीचे पूर्व नियोजन उमेदवारांनी स्वतःहून करणे व कोणत्याही परिस्थितीत विहित वेळेपूर्वी पुरेसे अगोदर संबंधीत परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

* यासंदर्भातील विलंबाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी आयोगाची राहणार नाही अथवा विहित वेळेनंतर उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.