रविवार, ९ जुलै, २०१७

भारत लवकरच होणार [GFXC] चा सदस्य - १० जुलै २०१७

भारत लवकरच होणार [GFXC] चा सदस्य - १० जुलै २०१७

* जागतिक परकीय चलन विनिमय समितीचा [GFXC - Global Foreign Exchange Committee] भारत लवकरच सदस्य होणार आहे. परकी चलन विनिमय बाजाराला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

* परकीय चलन विनिमय बाजाराला चालना देऊन व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्रीय बँकांचे प्रमुख आणि तंज्ञाची एका नव्या समितीची स्थापना केली आहे.

* ही समिती बँक फॉर इंटरनॅशनल या संघटनेच्या [बीआयएस] कडे ६० देशांच्या केंद्रीय बँकांचे सदस्यत्व आहे.

* आर्थिक क्षेत्रातील धोके, गैरव्यवहार कमी करण्यासंबंधी अहवालामध्ये याबाबतची माहिती देण्यात आली. आर्थिक स्थैर्य मंडळाने [एफएसबी] जी -२० परिषदेत याबाबत माहिती दिली.

* एफएसबी ही जागतिक अर्थव्यवहार व्यवस्थेवर काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जागतिक परकीय विनिमय संहिता आणखी कडक करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.