रविवार, १६ जुलै, २०१७

राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक - १७ जुलै २०१७

राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक - १७ जुलै २०१७

* राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे [ एनडीए ] उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत होणार आहे.

* प्रारंभिक पातळीवर मतांच्या आकडेवारीत कोविंद यांच्यापेक्षा मीरा कुमार पिछाडीवर असल्याचे दिसून येते, तरी येत्या २१ जुलैला मतमोजणी होणार आहे.

* राष्ट्रपतींची निवड इलेक्ट्रोल कॉलेजचे सदस्य करतात. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे आणि राज्यांच्या विधिमंडळाचे सदस्य यांचा समावेश आहे.

* या निवडणुकीसाठी ४ हजार ८९६ मतदार असून त्यात ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांचा समावेश आहे.

* यासाठी एकूण ३२ मतदान केंद्र आहेत. [ संसद भवन आणि प्रत्येक राज्यातील विधानसभा ] एकूण ३३ निरीक्षक [ दोन संसद भवन येथे तर प्रत्येक राज्यातील एक विधानसभा येथे ]

* निवडणूक आयोगाने खासदार आणि विधिमंडळाच्या आमदारांना मतदान केंद्रात स्वतःचा पेन नेण्यास मनाई केली असून, मतदानासाठी खास पेन वापरणे बंधनकारक आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.