बुधवार, २६ जुलै, २०१७

महाराष्ट्रातील बैलगाडीच्या शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी - २७ जुलै २०१७

महाराष्ट्रातील बैलगाडीच्या शर्यतीच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी - २७ जुलै २०१७

* महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडीच्या शर्यती सुरु करण्यातील अडथळे आता दूर झाले आहेत. त्यासंबंधी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकावर मंजूर केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी केली आहे.

* तामिळनाडूमध्ये बैलाचा जल्लीकट्टू हा खेळ आणि महाराष्ट्राच्या बैलगाडीच्या शर्यती यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. पशुप्रेमी संघटनांनी या खेळावर बंदी आणावी. अशी मागणी केली होती.

* दुसरीकडे बैलगाड्यांच्या शर्यतीत कोणतेही क्रूरता नाही आणि हा आमचा पारंपरिक खेळ आहे. असे या शर्यती आयोजित करण्याचे म्हणणे आहे.

* राज्यात पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी बैलगाडी शर्यती पुन्हा सुरु करता याव्यात यासाठी विधानसभेत पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मांडले.

* त्यावर बुधवारी स्वाक्षरी झाली असल्याची माहिती बुधवारी देण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विशेषतः पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यती सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.