मंगळवार, १८ जुलै, २०१७

डॉ मुरली बनावत यांना ब्रिक्सचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार - १८ जुलै २०१७

डॉ मुरली बनावत यांना ब्रिक्सचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार - १८ जुलै २०१७

* सौरऊर्जेच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे तेलंगणाचे वैज्ञानिक डॉ मुरली बनावत यांना ब्रिक्स देशांचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर केला आहे.

* हैद्राबाद विद्यापिठात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी सौरऊर्जेवर संशोधन केले आहे.

* मूळचे तेलंगणाचे निझामाबाद जिल्ह्यातील असलेल्या बनवात यांनी फोटोव्होल्टाइक सोलर सेलवर [ प्रकाशीय सौर विद्युतघट यावर संशोधन केले आहे.

* त्यांचे शोधनिबंध अनेक नामांकित नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून फ्रंटियर्स इन फिजिक्स या नियतकालिकांचे ते संपादकही आहेत.

* त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून बीएस्सी तर हैद्राबाद विद्यापीठातून एमएस्सीची पदवी घेतली. नंतर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतून फोटोव्होल्टाईक सेलवरपीएचडी केली.

* फोटोव्होल्टाईक सेलसाठी सेंद्रिय व पेरोव्ह्स्कईट पदार्थ किफायतशीर ठरतात. ही गोष्ट त्यांनी प्रथम प्रयोगनिशी दाखवून दिली.

* सौरऊर्जा हा प्रदूषणविरहित स्रोत असला तरी त्याच्या साठवणुकीत असलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

* सौरऊर्जा साठवणीसाठी नवनवीन रासायनिक पदार्थ विकसित करण्यात त्यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे.

* सौरघटाच्या निर्मितीत डॉ मुरली यांनी मोठे काम केले असून त्याचा ब्रिक्स देशांनाही होणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.