गुरुवार, ६ जुलै, २०१७

आजपासून २२ व्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धा भुवनेश्वर येथे सुरु - ६ जुलै २०१७

आजपासून २२ व्या  आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धा भुवनेश्वर येथे सुरु - ६ जुलै २०१७

* आजपासून आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धा भुवनेश्वर येथे सुरु होत असून यावर्षी पदकतालिकेत अव्वल कामगिरी करून कमीतकमी प्रथम तिनामध्ये येण्याचा मानस भारतातील खेळाडूचा असणार आहे.

* ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वर येथे या स्पर्धेच्या निमित्ताने ४५ देशातील सुमारे ८०० हुन अधिक ऍथलेटिक येणार आहेत. ते एकूण ४२ खेळप्रकारात कौशल्य दाखवणार आहेत.

* आजपर्यंत आशियाई स्पर्धेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पदके मिळविण्याच्या यादीमध्ये भारताने चीन आणि जपाननंतर ३ रे स्थान पटकावले आहे.

* मागच्या वर्षी वुहान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ४ स्वर्ण, ५ रौप्य, आणि ४ कांस्य, अशा एकूण १३ पदकासह स्पर्धेत ३ रे स्थान पटकावले होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.