शनिवार, १ जुलै, २०१७

केंद्राच्या सहकार्याने विषाणू संशोधन केंद्र उभारण्याची योजना - २ जुलै २०१७

केंद्राच्या सहकार्याने विषाणू संशोधन केंद्र उभारण्याची योजना - २ जुलै २०१७

* परळ येथील हाफकिन संशोधन व प्रशिक्षण संस्थेने टाटा कॅन्सर केंद्राच्या सहकार्यातून देशातील अग्रगण्य विषाणू संशोधन केंद्र उभारण्याची योजना तयार केली आहे. 

* सुमारे २० कोटी रुपयाचा हा प्रकल्प असून हाफकिन व टाटा कॅन्सर संयुक्तपणे याचा खर्च करणार आहोत. 

* आजमितीला देशात पुण्याची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, मुंबईतील इंट्रो व्हायरस रिसर्च सेंटर तसेच नोएडातील अमिटी इन्स्टिट्यूट ऑफ व्हरॉलॉजी अशी निवडक संस्था आहेत. 

* सर्व प्रकारच्या विषाणूंवर संशोधन तसेच चाचण्या आणि पदव्युत्तर शिक्षण देणारे सेंटर फॉर एक्सलन्स उभारण्यासाठी सुमारे हा प्रकल्प हाफकिन आणि टाटा कॅन्सर केंद्राकडून संयुक्तपणे उभारण्यात येणार आहे. 

* २००५ साली उद्भवलेला लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव, त्यानंतर २००९ सालचा स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव तसेच अँथ्रेक्स आदी विषाणूच्या हल्ल्याच्या वेळी हाफकिनमधील विषाणूशास्त्र विभागाने महत्वाचे योगदान दिले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.