बुधवार, १९ जुलै, २०१७

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी अमेरिकेत सुरु करणार उत्पादन केंद्र - १९ जुलै २०१७

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी अमेरिकेत सुरु करणार उत्पादन केंद्र - १९ जुलै २०१७

* देशातील मोठी ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आपले अमेरिकेत पहिले उत्पादन केंद्र सुरु करणार आहे.

* अमेरिकेच्या डेट्रॉईट येथे हे उत्पादन केंद्र सुरु करण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. अमेरिकेचा समावेश जगातील महत्वाच्या ऑटोमोबाईल बाजारपेठेत होत असल्यामुळे देशातील विस्तार करण्यासाठी कंपनीने निर्णय घेतला आहे.

* कंपनीने अमेरिकेत १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. कंपनीच्या अमेरिकेतील उत्पादन केंद्रामुळे अमेरिकेत ३ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

* कंपनीकडून अमेरिकेतील उत्पादन केंद्रात ऑफ रोड वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. कंपनीच्या अमेरिकेतील वाहनांचे डिझाईन कंपनीच्या उत्तर अमेरिकेतील तंत्रज्ञान केंद्रात तयार केले जाणार आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.