रविवार, २३ जुलै, २०१७

आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार डॉ डॉगबी ख्रिस न्याय यांना प्रदान - २३ जुलै २०१७

आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार डॉ डॉगबी ख्रिस न्याय यांना प्रदान - २३ जुलै २०१७

* इबोला, झिका, यासारख्या नवीन विषाणूजन्य रोगांचे संशोधन करणारे डॉ डॉगबी ख्रिस न्यान यांना प्रतिष्टेचा आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार जाहीर.

* त्यांनी वेगवेगळ्या रोगांचे विषाणू शोधून निदान करण्याच्या शोधलेल्या चाचणीसाठी त्यांना आफ्रिकेचा हा नोबेलच्या तोडीचा पुरस्कार देण्यात आला.

* त्यांच्या या चाचणीद्वारे अवघ्या एक तासात विषाणू कुठल्या रोगाचा आहे ते समजते. ही चाचणी सोपी व कमी खर्चिक आहे.

* आफ्रिकेसारख्या अप्रगत देशातील दूरस्थ भागातील लोकांसाठी या चाचणीचा व्यवसायिक वापर सुरू होईल. तेव्हा ती रोगनिदानातील मोठी क्रांती असेल.

* आफ्रिकन इनोव्हेशन फाउंडेशनद्वारे आफ्रिकेतील नवप्रवर्तक संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी आफ्रिका नवसंशोधन पुरस्कार देण्यात येतो.

* स्वित्झर्लंड दानशूर उद्योजक जीन क्लॉद बॅस्टस द मोराईस यांनी या फाउंडेशनची स्थापना केली . 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.